महाराष्ट्र शासन | जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
उपक्रम : जन्म मृत्यू व इतर दाखले वितरीत करणे कामी प्रभाग निहाय स्वतंत्र संगणकीकृत व्यवस्था तयार करणे.
नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र. ३ येथे जन्म मृत्यू दाखला वितरण
आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका 1 July 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र. ३ येथे जन्म मृत्यू दाखला वितरण सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एक स्वतंत्र डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक संगणक व एक कलर प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रावर नागरिकांनी अर्ज करून दाखले उपलब्ध करून घेण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र. ४ येथे जन्म मृत्यू दाखला वितरण
आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका 30 June 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र. ४ येथे जन्म मृत्यू दाखला वितरण सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एक स्वतंत्र डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक संगणक व एक कलर प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रावर नागरिकांनी अर्ज करून दाखले उपलब्ध करून घेण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र. २ येथे जन्म मृत्यू दाखला वितरण
आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका 27 June 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र. २ येथे जन्म मृत्यू दाखला वितरण सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एक स्वतंत्र डेटा एन्ट्री ऑपरेटर, एक संगणक व एक कलर प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रावर नागरिकांनी अर्ज करून दाखले उपलब्ध करून घेण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उपक्रम : जिल्हयांतील सर्व ज्येष्ठ नागरिक यांची संख्या निश्चित करुन त्यांची आरोग्य तपासणी करणे.
श्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली या अंतर्गत जेष्ठ नागरिक तपासणी
गटविकास अधिकारी करवीर करवीर 26 June 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी या ठिकाणी श्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली या अंतर्गत जेष्ठ नागरिक तपासणी करणेत आलेले आहे. यामध्ये सर्व नागरिकांची रक्त तपासणी,ब्लडप्रेशर, आरोग्य माहिती, डॉक्टर भूषण मस्के वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी यांनी शिबिरात सविस्तर माहिती देण्यात आली.
जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी , रक्त तपासणी, बीपी तपासणी आरोग्य मार्गदर्शन प्रा आ केंद्र क.आरळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर डॉ अंकिता कानूगडे वैद्यकीय अधिकारी, श्री एल एम दुधवाडकर आरोग्य सहाय्यक, श्रीमती संध्या महाजन आरोग्य सहायिका , आरोग्य सेविका रेवती पोर्लेकर, आशा सेविका, व सर्व ग्रामस्थ,,
नागरी सुविधा केंद्र, मुख्य इमारत येथे जन्म मृत्यू दाखला वितरण
आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका 25 June 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नागरी सुविधा केंद्र, मुख्य इमारत येथे जन्म मृत्यू दाखला वितरण सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी चार स्वतंत्र डेटा एन्ट्री ऑपरेटर, चार संगणक व दोन कलर प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रावर नागरिकांनी अर्ज करून दाखले उपलब्ध करून घेण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आरोग्य वरधिनी केंद्र शेळोली येथे जेष्ठ नागरिक तपसिनी करणेत आली
गटविकास अधिकारी भुदरगड भुदरगड 25 June 2025
उपक्रम : जिल्हयांतील सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करणे.
आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप
प्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे बु अंतर्गत मौजे कलनाकवाडी येथे आशा स्वयं सेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आले
उपक्रम : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणीमध्ये आढळून आलेल्या सर्व आजारी विद्यार्थ्यांवर आवश्यक उपचार करणे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया शिबीर
जिल्हा शल्यचिकित्सक 25 June 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यकमांतर्गत ग्रामीण रुग्णालय हातकणंगले , येथे कार्यरत वैदयकिय पथकाकडून शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये Circumcision - 5 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी सर्जन डॉ. राजीव जाधव व भुलतज्ञ - डॉ . स्नेहल व्हटकर यांचे सहकार्य लाभले .
उपक्रम : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, मोकळया जागा व पदपथावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविणे.
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत अतिक्रमण मुक्त शहरासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रयत्न
आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका 22 June 2025
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार उपायुक्त नंदू परळकर, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष सावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील रस्ते मोकळ्या जागा व पदपथा वरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे .या मोहिमेत शहरातील शहापूर रोड आर.टी.ओ. कार्यालय समोरील येथील फुटपाथवरील पत्र्याचे शेड, लक्ष्मी मार्केट येथील स्टॉलचे अतिक्रमण हटविले तसेच नेहरूनगर झोपडपट्टी येथील रस्त्यावर विनापरवाना लावलेली कमान काढून जप्त करण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे , गणेश पुजारी , हिंदुराव जावळे , गणेश आवळे , आकाश बोरे , विकास लाखे , मारुती जावळे , रोहित कांबळे , विनोद गेजगे , दिलीप भोरे आदिंचा सहभाग होता.
उपक्रम : हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे.
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकरण अभियान राबविणे बाबत
आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका 20 June 2025
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी लेखापरीक्षण व उद्यान विभाग अंतर्गत मुसळे हायस्कूल मागील बाजूस, सिद्धकला कॉलनी ते इंद्रप्रस्त कॉलनी परिसर ९० रोपांचे वृक्षारोपण मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आला.
उपक्रम : महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे.
महानगरपालिका सर्व शाळामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करणे
१. उपक्रमाचे नाव: मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत शाळांमध्ये सुरक्षा उपाययोजना २. उपक्रमाचे स्वरूप: इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व 34 शाळांमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. ४. उपक्रमाची गरज: शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सुरक्षा, शिस्तपालन, तसेच अनधिकृत हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक होते. ५. केलेली कृती: प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वार, पटांगण, मोकळ्या जागा, जिने आणि इतर संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. नियंत्रण कक्षातून थेट देखरेख ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. कॅमेरे HD दर्जाचे असून त्यामध्ये सतत रेकॉर्डिंग व 30 दिवसांचा डेटाबेस जतन करण्याची सुविधा आहे. ६. उपक्रमाचा परिणाम: शाळांमधील अनुशासनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. शाळेच्या परिसरातील गैरप्रकार, विनाकारण वावरणे, भांडणे, हानीकारक कृती यांना शंभर टक्के आळा बसलेला आहे. पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण झाला आहे. विद्यार्थी व शिक्षक आता अधिक सुरक्षित वातावरणात शिक्षण व अध्यापन करत आहेत. ८. उपसंहार: मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षिततेचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावलेला आहे. हा उपक्रम इतर शहरांसाठीही अनुकरणीय ठरेल
उपक्रम : जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणे.
जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण जनतेला दररोज 55 लिटर्स प्रति माणसी प्रति दिनी वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करणे.
जिल्हा परिषद कोल्हापूर 20 June 2025
जल जीवन मिशन अंतर्गत 1) ग्रामीण भागातील अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनाच्या वापरण्या योग्य उपांगांची दुरुस्ती करुन परत वापरात आणणे. 2) आवश्यकतेनुसार नवीन उपांगांची समावेश करणे 3) योजनेचा 30 वर्षाचा कालावधी लक्षात घेता आवश्यकतेनुसार पाणी साठवण टाकची क्षमता वाढवणे. 4) जल जीवन मिशन अंतर्गत बहुतांश योजनांना नेट मिटरींगचे सोलर पॅनेल प्रस्तावित करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामपंचायतींना येणारे अवाढव्य वीज बिलामध्ये बचत करता येणार आहे. 5) सदर योजने अंतर्गत गावा अंतर्गत सर्व घरांना नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करुन सदर गावे हर घर जल घोषित करणे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात 663 गावे हर घर जल घोषित करण्यात आले आहेत. 6) जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 1237 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 7)प्रगतीपथावरील योजना - 686 8) भौतिक दृष्ट्या पूर्ण योजना 522 आहेत.
उपक्रम : जिल्हयातील जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकांची स्वच्छता मोहिम राबविणे.
कोल्हापूर विभागातील चंदगड बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग 20 June 2025
कोल्हापूर विभागातील चंदगड बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे करिता चंदगड बस स्थानक व चंदगड आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी चंदगड बस स्थानक येथे स्वच्छता अभियान केले
कोल्हापूर विभागातील हुपरी बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे
कोल्हापूर विभागातील हुपरी बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे करिता हुपरी बस स्थानक व कागल आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी चंदगड बस स्थानक येथे स्वच्छता अभियान केले
कोल्हापूर विभागातील कुरुंदवाड बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे
कोल्हापूर विभागातील कुरुंदवाड बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे करिता कुरुंदवाड बस स्थानक व कुरुंदवाड आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी कुरुंदवाड बस स्थानक येथे स्वच्छता अभियान केले
कोल्हापूर विभागातील राधानगरी बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे
कोल्हापूर विभागातील राधानगरी बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे करिता राधानगरी बस स्थानक व राधानगरी आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी राधानगरी बस स्थानक येथे स्वच्छता अभियान केले
उपक्रम : प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात किमान 10 वैयक्तिक स्वरुपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणे. (नाडेप, शोषखडडे, सिंचन विहिर,फळबाग लागवड, बांबू लागवड, रेशीम लागवड इ.)
10 वैयक्तिक स्वरुपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणे. (नाडेप, शोषखड्डे, सिंचन विहिर, फळबाग लागवड, बांबू लागवड, जलतारा, रेशीम लागवड, घरकुले इ.)
अभियान काळात प्रत्येक ग्राम पंचायतसाठी 10 वैयक्तिक कामे घेऊन ती पूर्ण करणेसाठी जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट 10000 इतके आहे. सदरचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी जिल्हा स्तरावरुन व्ही.सी. द्वारे सर्व ग.वि.अ., सहायक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी पंचायत समिती यांना लाभार्थी निवड करुन कामे सुरु करुन ती अभियान काळात पूर्ण करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे लाभार्थी निवडले आहेत. त्यांची माहिती वेब साईटला भरणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये अभियान काळात 3445 घरकुले सुरू आहेत. तसेच 374 इतर कामे सुरू आहेत.
कोल्हापूर विभागातील रंकाळा बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे
कोल्हापूर विभागातील रंकाळा बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम दिनांक २०.०६. २०२५ रोजी कोल्हापूर विभागातील रंकाळा बसस्थानक येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये बसस्थानानकांची सखोल स्वच्छता करण्यात आली सादर मोहिमेत नागोजीराव पाटणकर हायस्कुलचे एन. सी. सी. चे विध्यार्थी सहभागी झाले होते तसेच संभाजीनगर आगारातील कर्मचारी , अधिकारी तसेच पर्यवेक्षक यांनी सहभाग घेतला
कोल्हापूर विभागातील गारगोटी बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे
कोल्हापूर विभागातील गारगोटी बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे करिता गारगोटी बस स्थानक व गारगोटी आगारातील अधिकारी तसेच कर्मवीर हिरे महाविध्यालय येथील एन. सी.सी. चे विध्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते
कोल्हापूर विभागातील मुरगूड बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम
8. कोल्हापूर विभागातील मुरगूड बस स्थानक येथे मा . मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणे करिता मुरगूड बस स्थानक व गारगोटी आगारातील अधिकारी तसेच मुरगूड महाविध्यालय / शिवराज विद्यालय येथील विध्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते
उपक्रम : जिल्हयांतील सर्व दुय्य्यम निबंधक कार्यालयातील सेवांचा दर्जा उन्नतकरणेसाठी विशेष अभियान राबविणे.
पक्षकारांना सोयी सुविधा देणेबाबत
सहजिल्हा मुद्रांक विभाग 19 June 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, करवीर १ या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.
उपक्रम : जिल्हयांतील सर्व दुय्य्यम निबंधक कार्यालयातील अभिलेख कक्ष अद्ययावत करणे.
सह दुय्यम निबंधक, करवीर १ - अभिलेख अद्यावत करणे
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात अभिलेख सुस्थितीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक, करवीर १ कार्यालयात अभिलेख लावण्याची कार्यवाही चालू आहे.
उपक्रम : जिल्हयांतील सर्व प्रभाग संघ व ग्राम संघ यांना कार्यालय उपलब्ध करुन देणे व त्यांना किमान एक उत्पादन तयार करणेसाठी प्रशिक्षित करणे.
जिल्ह्यातील सर्व ग्राम संघ यांना कार्यालय उपलब्ध करुन देणे व त्यांना किमान एक उत्पादन करून देणे व त्यांना किमान एक उत्पादन तयार करण्यासाठी प्रशिक्षित करणे.
जिल्हा परिषद कोल्हापूर 19 June 2025
आरसेटी संस्थेमार्फत आजरा तालुक्यामध्ये बांबु क्राफ्टचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, भुदरगड मध्ये पापड, लोणचे कागल, राधानगरी, गडहिंग्लज या तालुक्यामध्ये FAST FOOD चे प्रशिक्षण देण्यात आले.
उपक्रम : प्रत्येक तालुक्यातील किमान 10 माध्यमिक विद्यालयांमध्ये संस्कार शिबीर आयोजित करणे.
प्रत्येक तालुक्यातील किमान 10 माध्यमिक विद्यालयांमध्ये संस्कार शिबीर आयोजित करणे.
प्रत्येक तालुक्यातील 10 पेक्षा अधिक माध्यमिक विद्यालयांमध्ये उन्हाळी सुटटीमध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. या संस्कार शिबिरांतर्गत योगा प्रशिक्षण, ऍरोबिक्स, लाठीकाठी प्रशिक्षण, विविध खेळांचे प्रशिक्षण, विविध साहित्यनिर्मिती, हस्तकला, चित्ररेखाटन इ.उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता उपक्रमांतर्गत जन्म मृत्यू दाखले वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ
आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका 19 June 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता उपक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील A,B,C,D. या चारही झोन अंतर्गत जन्म मृत्यू दाखले वितरण कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ महानगरपालिकेच्या सी.एफ.सी. केंद्रामध्ये दि.१९ जून रोजी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त रोशनी गोडे आरोग्य अधिकारी डॉ.सुनील दत्त संगेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चारही झोनचे क्षेत्रीय अधिकारी तसेच सी.एफ.सी. केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत क्लब फूट दोषी असलेल्या बालकावर Tenotomy ची यशस्वी शस्त्रक्रिया व TONGUE TIE , SAM /MAM अशा १० बालकासाठी संदर्भ सेवा शिबीर
जिल्हा शल्यचिकित्सक 19 June 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथील कार्यरत पथक क्रमांक २ यांनी संदर्भित केलेल्या क्लब फूट दोषी असलेल्या बालकावर खाजगी रुग्णालयामध्ये Tenotomy ची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय , पारगाव येथे RBSK वैद्यकीय पथकाकडून तपासणी मधून संदर्भित करण्यात आलेल्या TONGUE TIE , SAM /MAM अशा १० बालकासाठी संदर्भ सेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास डॉक्टर ज्योती कांबळे ( बालरॊग तज्ञ ) म्हणून उपस्थित होत्या.
राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया शिबिर व संदर्भसेवा शिबीर
जिल्हा शल्यचिकित्सक 18 June 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान ,राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सेवा रुग्णालय क़सबा बावडा ,तालुका करवीर येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून संदर्भित केलेल्या शस्त्रक्रिया साठी पात्र असणाऱ्या बालकांसाठी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरामध्ये Hydrocele - 1,Hernia-1 phimosis-2 अश्या एकूण ४ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत . या शस्त्रक्रिया शिबिरासाठी डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे (बालरोग शल्यचिकित्सक ),डॉक्टर सुनील कुरुंदवाडे (सर्जन) इ .यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून कान ,नाक ,घसा दोष असणाऱ्या बालकांसाठी संदर्भसेवा शिबीर सामान्य रुग्नालय IGGH Ichalkarnji येथे घेण्यात आले होते . सदर शिबिरास ५ मुलांना संदर्भसेवा देण्यात आल्या.
उपक्रम : जिल्हयातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी गाई व म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवून जातिवंत मादी जनावरांची पैदास करणे.
कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविणे.
पशुसंवर्धन विभाग 18 June 2025
कृत्रिम रेतन उपक्रम राबविताना डॉ अविनाश जाधव पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय चिकित्सालय कोतोली ता.पन्हाळा
सहजिल्हा मुद्रांक विभाग 18 June 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, चंदगड या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.
सहजिल्हा मुद्रांक विभाग 17 June 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, आजरा या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठी व्हील चेयरची व्यवस्था करण्यात आली आहे.
सह दुय्यम निबंधक, आजरा - अभिलेख अद्यावत करणे
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात अभिलेख सुस्थितीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक, आजरा कार्यालयात अभिलेख लावण्याची कार्यवाही चालू आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक 17 June 2025
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय राधानगरी व ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे कार्यरत वैद्यकीय पथकाकडून शस्त्रक्रिया साठी पात्र ठरलेल्या मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. या मध्ये एकूण फायमोसिस चे १३ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.
शस्त्रक्रिया शिबीर ,हृदय शस्त्रक्रिया (ASD Surgical Closure)
जिल्हा शल्यचिकित्सक 16 June 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कोडोली, तालुका पन्हाळा येथील पथकाने आरोग्य तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते . सदर शिबिरामध्ये ८ फायमोसिस व १ इंगव्यानल हर्निया च्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिरामध्ये डॉक्टर महाजन {सर्जन } व डॉक्टर ज्योती कोले मॅडम { भूलतज्ञ् } म्हणून उपस्थित होते . राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत महानगरपालिका पथक क्रमांक २ यांनी संदर्भित केलेल्या कु. वैष्णवी माडीकर वय ११ वर्षे या मुलीची कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया (ASD Surgical Closure) झालेली आहे.
सहजिल्हा मुद्रांक विभाग 16 June 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, शिरोळ या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे.
उपक्रम : इतर उपक्रम
शासकीय निवासी शाळा प्रवेश
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण 16 June 2025
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांचेमार्फत् सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांचे अधिनस्त जिल्हयामध्ये एकूण 04 मुलांचा निवासी शाळा सुरू आहेत. या शाळामध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करिता एकूण 528 विद्यार्थी प्रवेशित आहेत. दि.16.06.2025 रोजी नवीन प्रवेशित विद्यार्यांचा प्रवेशात्सव साजरा करणेत आला आहे.
उपक्रम : महानगरपालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपब्लध करुन देणे
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत सफाई कामगारांची आरोग्य तपासणी
आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका 16 June 2025
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत आयुक्त तथा प्रशासन पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिका आणि शहरातील ६ नागरि आरोग्य सेवा केंद्रांच्या सहकार्याने झोन निहाय महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास ५५० महिला आणि पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येवून आवश्यकतेनुसार रक्त तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. शोभा लांडे, डॉ.यास्मिन पठाण, डॉ वैभव साळे,डॉ.प्राची ढाले, डॉ. दिनेश चव्हाण यांचे सह नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर या आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपक्रम : शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे.
सुरक्षितेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कार्यान्वित करणे
मुख्याधिकारी हुपरी नगर परिषद हातकणंगले 16 June 2025
सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून हुपरी शहरात सीसीटीव्ही बसविले
आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका 14 June 2025
१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ कालावधीत हरित शहर व शहर सौंदर्यीकर अभियान राबविणे अंतर्गत इचलकरंजी महापालिका क्षेत्रा मध्ये विविध ठिकाणी पहिल्या टप्प्या मध्ये १०,००० रोपांचे वृक्षारोपण पैकी भांडार व उद्यान विभाग अंतर्गत विनायक हायस्कूल येथे १०५ रोपांचे वृक्षारोपण मा.आयुक्त तथा प्रशासक व सर्व उपयुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात आला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दिनांक १४/०६/२०२५ रोजी रोगनिदान शिबीर व संदर्भसेवा शिबीराचे आयोजण करण्यात आले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक 14 June 2025
दिनांक १४/०६/२०२५ रोजी ग्रामीण रुग्णालाय चंदगड येथे रोगनिदान शिबीर व ग्रामीण रुग्णालाय राधानगरी येथे संदर्भसेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालाय चंदगड येथील रोगनिदान शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवराज कुपेकर व बालरोग तज्ञ् डॉक्टर गजेंद्र पाटील म्हणून उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालाय राधानगरी येथे संदर्भसेवा शिबीरास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनंदा गायकवाड बालरोग तज्ञ् म्हणून उपस्थित होत्या .
उपक्रम : उत्कृष्ट पशुपालक व स्वच्छ, सुंदर गोठा अभियान राबविणे.
उत्कृष्ट पशुपालक व स्वच्छ, सुंदर गोठा अभियान राबविणे.
जिल्हा परिषद कोल्हापूर 13 June 2025
संपूर्ण जिल्हयातील सर्व गावांमधील एकूण 320 गोठयांची प्राथमिक निवड करण्यात आलेली असून सर्व गोठयांना पशुधन विकास अधिकारी यांनी भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित गोठयांची प्राथमिक निवड सुरु असून जूनअखेर उद्यिष्टाप्रमाणे सर्व गोठयांची निवड करणेत येणार आहे.
२ डी इको कॅम्प आणि neural tube defect surgery
जिल्हा शल्यचिकित्सक 13 June 2025
गडहिंग्लज येथील डॉक्टर बार्देसकर हॉस्पिटल येथे आरबीएसके पथकाकडून संदर्भित करण्यात आलेल्या संशयित हृदयदोशी बालकासाठी २ डी इको कॅम्प आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिका पथक १ कडून संदर्भित करण्यात आलेल्या बाळाचे सी पी आर कोल्हापूर येथे neural tube defect शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली .
उपक्रम : जिल्हयांतील आजी माजी सैनिकांच्या समस्या निवारणाकरीता प्रत्येक तालुकास्तरावर उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली सैनिक अदालत आयोजित करणे.
जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या समस्या निवारणाकरिता प्रत्येक तालुकास्तरावर उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली सैनिक अदालत आयोजित करणे बाबत
जिल्हा सैनिक कल्याण विभाग 13 June 2025
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत मा. मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर मा. ना.प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार व मा.श्री.अमोल येडगे (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक तालुक्यात उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सैनिक अदालत ची बैठक /मिटिंग आयोजित करण्यात येईल. त्याची सूचना सबंधित उप विभागीय अधिकारी यांनी सैनिक अदालत ची तारीख कळविल्या नंतर सबंधित तालुक्यातील माजी सैनिकाना मोबाईल द्वारे कळविले जाईल. सदर बैठकीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तर्फे एक कर्मचारी उपस्थित असेल. या अभियान चा जास्तीत जास्त आजी सैनिकांच्या परिवार व माजी सैनिकांनी लाभ घ्यावा.
आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करणे
गटविकास अधिकारी शिरोळ शिरोळ 13 June 2025
वाटप केलेल्या कार्डाची संख्या 99923
उपक्रम : नगर पालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपब्लध करुन देणे.
नगरपालिके कडील कार्यरत असणाऱ्या सर्व सफाई कामगारांचे आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बाबत
मुख्याधिकारी चंदगड नगर परिषद चंदगड 13 June 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 01/ 05/2025 ते 15/08/2025 या कालावधीत श्री प्रकाश आबीटकर सौ.पालकमंत्री कोल्हापूर यांच्या सौजन्याने राबविण्यात येत आहे. याअभियानां अतर्गत चंदगड नगरपंचायत कार्यालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. दिनांक 13/07:25 रोजी चंदगड नगरपंचायत कार्यालयातील आरोग्य विभागाकडील मुकादम व ग्रा.प कालीन समावेशित 11 सफाई कर्मचारी अशा एकूण 12 कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे करण्यात आले आहे आरोग्य तपासणी मध्ये सफाई कर्मचारी यांचे रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी व आवश्यकतेनुसार धनुर्वादाचे इंजेक्शन इत्यादी तपासणी व उपचार करण्यात आली. रक्त तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचार मा. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यांचे निर्देशनानुसार करण्यात येतील सर्व सफाई कर्मचारी यांना मागील महिना दिनांक 27/05 /2025 रोजी मास्क देण्यात आले होते त्यांचे पुढील आरोग्य तपासणी तीन महिन्यानंतर करण्यात येईल.
सहजिल्हा मुद्रांक विभाग 13 June 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, मुरगूड या कार्यालयात कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे. तसेच पक्षकारांना दैनिक वर्तमान पत्र वाचण्यासाठी उपलब्ध केले आहेत.
सह दुय्यम निबंधक, मुरगूड - अभिलेख अद्यावत करणे
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात अभिलेख सुस्थितीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक, मुरगूड कार्यालयात अभिलेख लावण्याची कार्यवाही चालू आहे.
सहजिल्हा मुद्रांक विभाग 12 June 2025
दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांना आवश्यक असणाऱ्या सोयी जसे पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यापैकी सह दुय्यम निबंधक, करवीर ३ या कार्यालयात पक्षकारांना पिण्याच्या पाण्याची व बैठकीची सोय पुरेशी करण्यात आली आहे. तसेच पक्षकारांना दैनिक वर्तमान पत्र वाचण्यासाठी उपलब्ध केले आहेत.
सह दुय्यम निबंधक, करवीर ३- अभिलेख अद्यावत करणे
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत जिल्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात अभिलेख सुस्थितीत करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक, करवीर ३ कार्यालयात अभिलेख लावण्याची कार्यवाही चालू आहे.
उपक्रम : शहरातील Garbage Vulnerable Points शोधून त्यांचे सौंदर्यीकरण करणे.
कागल शहरातील GVP ठिकाणे शोधून त्यांचे सौंदर्यीकरण करणे
मुख्याधिकारी कागल नगर परिषद कागल 11 June 2025
कचरा पडणारे ठिकाणे निश्चित करण्यात येऊन त्या ठिकाणी भिंती चित्रे (Wall Painting), सेल्फी पॉइंट बनविण्यात आले आहेत. शहरातील एसटी स्टँड येथे "आपलं कागल" सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे व संत राहिदास हायस्कूलची सर्व कंपाऊंड वॉल जेथे प्लास्टिक किंवा कचरा फेकला जात असत तेथे भिंती चित्रे (Wall Painting) स्पर्धा अंतर्गत सुंदर ऐतिहासिक तसेच पर्यावरण प्रबोधन देणारे चित्रे रंगवण्यात आली आहेत.