13
Jun 25
जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या समस्या निवारणाकरिता प्रत्येक तालुकास्तरावर उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली सैनिक अदालत आयोजित करणे बाबत

मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत मा. मंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर मा. ना.प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार व मा.श्री.अमोल येडगे (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक तालुक्यात उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सैनिक अदालत ची बैठक /मिटिंग आयोजित करण्यात येईल. त्याची सूचना सबंधित उप विभागीय अधिकारी यांनी सैनिक अदालत ची तारीख कळविल्या नंतर सबंधित तालुक्यातील माजी सैनिकाना मोबाईल द्वारे कळविले जाईल. सदर बैठकीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तर्फे एक कर्मचारी उपस्थित असेल. या अभियान चा जास्तीत जास्त आजी सैनिकांच्या परिवार व माजी सैनिकांनी लाभ घ्यावा.

अधिक माहिती...