31
May 25
कागल नगरपालिका कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारणे

ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने कागल नगरपरिषद विविध उपाययोजना करत आहे. त्यानुसार कागल नगरपरिषद क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी २ विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कागल नगरपरिषद मालकीची जागा असलेल्या यशवंत किल्ला व गांधी वाचनालय येथे हि दोन विरंगुळा केंद्रे स्थापन करणेत येत आहेत. त्यातील गांधी वाचनालय या विरंगुळा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १ केंद्रांची काम येत्या काही दिवसांत पूर्णत्वास जाणार आहे. विरंगुळ्याचीही साधने - यात कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, ल्युडो, इनडोअर गेम्स, म्युझिक सिस्टीम, वर्तमान पत्रे, विविध पुस्तके आदी उपलब्ध केली जाणार आहेत.

अधिक माहिती...
28
May 25
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र

दि.28/05/2025 रोजीपासून उक्त विषयी कार्यवाही सुरू करणेत आलेली आहे.

अधिक माहिती...
22
May 25
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद मार्फत तहसीलदार गार्डन येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरु करण्यात आले.

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद हद्दीत सि.स.नं. १९६ मधील तहसील कार्यालयाजवळील जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र विकसित करण्यात आले आहे. सदर विरंगुळा केंद्रामध्ये बैठक व्यवस्था, लाईट व्यवस्था, सुशोभिकरण, मंदिर इत्यादी गोष्टी विकसित करण्यात आलेल्या आहेत.

अधिक माहिती...
15
May 25
चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे बाबत

चंदगड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चंदगड नगरपंचायत मालकीच्या अग्निशमन केंद्र नजीकच्या इमारतीत विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी टेबल व खुर्ची पुरविनेत आले असून आरामदायक बैठक व्यवस्था व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विरंगुळा केंद्र नजीक स्वच्छता गृहाची सोय देखील करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी पुस्तके, नियतकालिके व वर्तमानपत्रे उपलब्ध करून देणेत आलेली आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी CCTV MONITARING SYSTEM बसविण्यात आलेली आहे.

अधिक माहिती...