4
Jun 25
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः सुरक्षा-२०२४/प्र.क्र.२४३/एस.डी.-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०००३२, दि: २१ ऑगस्ट, २०२४ अन्वये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत आदेशित केले आहे. त्यास अनुसरून मा.ना. श्री. हसनसो मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२४-२५ मधून निधी उपलब्ध करून देऊन कागल नगरपरिषद हद्दीतील विविध ६ शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवणे हि कामे प्रस्तावित केली होती. त्यातील खालील तीन ठिकाणी सी सी टी व्ही बसवणे आले आहेत. 1. कागल नगपरिषद मालकिच्या गोपाळकृष्ण गोखले भाग शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवणे. 2. कागल नगपरिषद मालकिच्या श्री हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवणे. 3. कागल नगपरिषद मालकिच्या संत रोहिदास विदयामंदिर शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवणे. वरील सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत व प्रणाली कार्यान्वित केली आहे.