19
Jun 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता उपक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील A,B,C,D. या चारही झोन अंतर्गत जन्म मृत्यू दाखले वितरण कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ महानगरपालिकेच्या सी.एफ.सी. केंद्रामध्ये दि.१९ जून रोजी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त रोशनी गोडे आरोग्य अधिकारी डॉ.सुनील दत्त संगेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चारही झोनचे क्षेत्रीय अधिकारी तसेच सी.एफ.सी. केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते