16
May 25
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र प्रस्तावित

मा.पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) बाबत विहित नमुन्यातील माहिती सादर करणेबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी समाजविकास विभागाशी संबंधित “ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र” या मुद्द्यांबाबत या विभागाकडून प्रस्तावित कार्यवाहीची माहिती खालीलप्रमाणे - १) योजनेचे / उपक्रमाचे नांव व ठळक उद्दिष्ट/ उपक्रमाची माहिती - ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ चे अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय क्रमांक ज्येष्ठना २०१६/प्र.क्र. ७१/सामासू, दिनांक ०९ जुलै, २०१८ नुसार मा.मुख्यमंत्री यांचे १०० दिवसांचे प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत छ.शिवाजी उद्यान आणि संत ज्ञानेश्वर उद्यान या दोन ठिकाणी फेडरल बँकेमार्फत त्यांचे सी.एस.आर.कार्यक्रमांतर्गत “ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र” उभारण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. बँकेकडून सी.एस.आर.कार्यक्रमांतर्गत रक्कम रु. १०.०० लाखापर्यन्तचा खर्च करण्यात येणार असून त्यापेक्षा जादा खर्चाची रक्कम म.न.पा.निधीतून खर्च करण्यात येईल. २) योजनेचे निर्धारित लक्ष्य (Target) – ०२ ३) लक्ष्य साध्य करण्याचा कालावधी अभियान कालावधीत लक्ष्य साध्य करण्याचे टप्पे (माहितीनिहाय) --- ४) सदर लक्ष्य साध्य करावयास अनुसरणेत येणारी कार्यपद्धतीबाबत पत्र - प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता, दि. फेडरल बँक लि.,कोल्हापूर यांचेकडील क्र. GBD / 2025-26 /02 / IMC, दिनांक 14.05.2025 चे पत्रास अनुसरून (प्रत संलग्न) बँकेच्या सी.एस.आर.कार्यक्रमांतर्गत उक्त दोन ठिकाणी “ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र” उभारण्याची कार्यवाही त्वरित करण्याबाबत बँकेस जा.क्र. इमपा/सं.वि.वि./ ४०५/ २०२५,दिनांक १६.०६.२०२५ चे पत्रान्वये कळविण्यात आले आहे (प्रत संलग्न). बँक प्रतिनिधी यांनी दिनांक १६.०६.२०२५ रोजी उक्त दोन्ही जागांची समक्ष पाहणी केली आहे. ५) सदर योजनेची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावयाच्या अहवालाचा नमुना – --- ६) सदर माहिती सादर करणेकामी जबाबदार अधिकारी यांचे नांव, पदनाम व भ्रमणध्वनी क्रमांक महेंद्र क्षीरसागर,शहरअभियंता,इचलकरंजी महानगरपालिका भ्रमणध्वनी क्रमांक ८३८००६३४५६ ७) या कार्यक्रमासाठी नियुक्त समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांचे नांव, पदनाम व भ्रमणध्वनी क्रमांक श्री.नंदू परळकर, उपायुक्त,इचलकरंजी महानगरपालिका. भ्रमणध्वनी क्रमांक ७२४९४४८५५५

अधिक माहिती...