8
Jun 25
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण भागात प्रशिक्षित आपदा मित्र तयार करणे.

📌इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन मा.आयुक्तसो पल्लवी पाटील मॅडम यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिनांक ०१/०५/२०२५ ते दिनांक १५/०८/२०२५ या कालावधीत प्रशिक्षण कार्यशाळा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजरोजी रविवार दिनांक - ०८/०६/२०२५ रोजी इचलकरंजी लायन्स ब्लड बँक येथे मुख्य आवारात स्वयंसेवकांना प्रशिक्षण माहिती देण्यात आली,यावेळी माणूसकी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री.रवि नौशाद जावळे आणि टिम तसेच पोलिस बॉईज असोसिएशन इचलकरंजी चे सतिश चव्हाण आणि टिम यांना आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामग्रींचे तसेच आपत्ती व्यवस्थापनाची विविध कार्यप्रणाली यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित करत ते आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे राबविले पाहिजे या विषयी सविस्तर माहिती स्वयसेवकांस देण्यात आली, तसेच ती साहित्य सामग्री कशाप्रकारे हाताळवयाची वा कोणती खबरदारी घ्यायची याविषयी संक्षिप्त माहिती व प्रशिक्षण महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री.संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता ४० शिक्षित स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले, तसेच त्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका-प्रश्नांचे निराकरण करणेत आले, व आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना आपली सतर्कता बाळगून कशाप्रकारे सज्ज राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले... यावेळी अनेक स्वयंसेवक मुला- मुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

अधिक माहिती...
12
May 25
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण भागात प्रशिक्षित आपदा मित्र तयार करणे.

मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान... ----------------------------------------------- १ )📌इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन मा.आयुक्तसो पल्लवी पाटील मॅडम यांच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने दिनांक ०१/०५/२०२५ ते दिनांक १५/०८/२०२५ या कालावधीत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमास प्रारंभ पंचगंगा नदीवेस श्री.स्वामी समर्थ मंदीर केंद्र येथे आवारात करण्यात आला, यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामग्रींचे तसेच आपत्ती व्यवस्थापनाची विविध कार्यप्रणाली यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित करत ते आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे राबविले पाहिजे या विषयी सविस्तर माहिती स्वयसेवकांस देऊन तसेच ती साहित्य सामग्री कशाप्रकारे हाताळवयाची वा कोणती खबरदारी घ्यायची याविषयी संक्षिप्त माहिती व प्रशिक्षण महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री.संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता प्रशिक्षण ६५ प्रशिक्षित स्वयंसेवकांना दिले, तसेच त्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका-प्रश्नांचे निराकरण करणेत आले, व आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना आपली सतर्कता बाळगून कशाप्रकारे सज्ज राहिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले... यावेळी अनेक स्वयंसेवक मुला- मुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

अधिक माहिती...