20
Jun 25
१. उपक्रमाचे नाव:
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत शाळांमध्ये सुरक्षा उपाययोजना
२. उपक्रमाचे स्वरूप:
इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व 34 शाळांमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
४. उपक्रमाची गरज:
शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे सुरक्षा, शिस्तपालन, तसेच अनधिकृत हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक होते.
५. केलेली कृती:
प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वार, पटांगण, मोकळ्या जागा, जिने आणि इतर संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
नियंत्रण कक्षातून थेट देखरेख ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.
कॅमेरे HD दर्जाचे असून त्यामध्ये सतत रेकॉर्डिंग व 30 दिवसांचा डेटाबेस जतन करण्याची सुविधा आहे.
६. उपक्रमाचा परिणाम:
शाळांमधील अनुशासनात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
शाळेच्या परिसरातील गैरप्रकार, विनाकारण वावरणे, भांडणे, हानीकारक कृती यांना शंभर टक्के आळा बसलेला आहे.
पालकांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण झाला आहे.
विद्यार्थी व शिक्षक आता अधिक सुरक्षित वातावरणात शिक्षण व अध्यापन करत आहेत.
८. उपसंहार:
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षिततेचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावलेला आहे. हा उपक्रम इतर शहरांसाठीही अनुकरणीय ठरेल