22
Jun 25
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार
उपायुक्त नंदू परळकर, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष सावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील रस्ते मोकळ्या जागा व पदपथा वरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे .या मोहिमेत शहरातील शहापूर रोड आर.टी.ओ. कार्यालय समोरील येथील फुटपाथवरील पत्र्याचे शेड,
लक्ष्मी मार्केट येथील स्टॉलचे अतिक्रमण हटविले तसेच नेहरूनगर झोपडपट्टी येथील रस्त्यावर विनापरवाना लावलेली कमान काढून जप्त करण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे , गणेश पुजारी , हिंदुराव जावळे , गणेश आवळे , आकाश बोरे , विकास लाखे , मारुती जावळे , रोहित कांबळे , विनोद गेजगे , दिलीप भोरे आदिंचा सहभाग होता.