18
Jun 25
राष्ट्रीय आरोग्य अभियान ,राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सेवा रुग्णालय क़सबा बावडा ,तालुका करवीर येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून संदर्भित केलेल्या शस्त्रक्रिया साठी पात्र असणाऱ्या बालकांसाठी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरामध्ये Hydrocele - 1,Hernia-1 phimosis-2 अश्या एकूण ४ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत . या शस्त्रक्रिया शिबिरासाठी डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे (बालरोग शल्यचिकित्सक ),डॉक्टर सुनील कुरुंदवाडे (सर्जन) इ .यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून कान ,नाक ,घसा दोष असणाऱ्या बालकांसाठी संदर्भसेवा शिबीर सामान्य रुग्नालय IGGH Ichalkarnji येथे घेण्यात आले होते . सदर शिबिरास ५ मुलांना संदर्भसेवा देण्यात आल्या.