20
Jun 25
10 वैयक्तिक स्वरुपाच्या कामांना मान्यता देऊन कामे पूर्ण करणे. (नाडेप, शोषखड्डे, सिंचन विहिर, फळबाग लागवड, बांबू लागवड, जलतारा, रेशीम लागवड, घरकुले इ.)

अभियान काळात प्रत्येक ग्राम पंचायतसाठी 10 वैयक्तिक कामे घेऊन ती पूर्ण करणेसाठी जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट 10000 इतके आहे. सदरचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी जिल्हा स्तरावरुन व्ही.सी. द्वारे सर्व ग.वि.अ., सहायक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी पंचायत समिती यांना लाभार्थी निवड करुन कामे सुरु करुन ती अभियान काळात पूर्ण करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे लाभार्थी निवडले आहेत. त्यांची माहिती वेब साईटला भरणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये अभियान काळात 3445 घरकुले सुरू आहेत. तसेच 374 इतर कामे सुरू आहेत.

अधिक माहिती...