20
Jun 25
जल जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामीण जनतेला दररोज 55 लिटर्स प्रति माणसी प्रति दिनी वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करणे.

जल जीवन मिशन अंतर्गत 1) ग्रामीण भागातील अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनाच्या वापरण्या योग्य उपांगांची दुरुस्ती करुन परत वापरात आणणे. 2) आवश्यकतेनुसार नवीन उपांगांची समावेश करणे 3) योजनेचा 30 वर्षाचा कालावधी लक्षात घेता आवश्यकतेनुसार पाणी साठवण टाकची क्षमता वाढवणे. 4) जल जीवन मिशन अंतर्गत बहुतांश योजनांना नेट मिटरींगचे सोलर पॅनेल प्रस्तावित करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामपंचायतींना येणारे अवाढव्य वीज बिलामध्ये बचत करता येणार आहे. 5) सदर योजने अंतर्गत गावा अंतर्गत सर्व घरांना नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करुन सदर गावे हर घर जल घोषित करणे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात 663 गावे हर घर जल घोषित करण्यात आले आहेत. 6) जल जीवन‍ मिशन अंतर्गत एकूण 1237 योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. 7)प्रगतीपथावरील योजना - 686 8) भौतिक दृष्ट्या पूर्ण योजना 522 आहेत.

अधिक माहिती...