संपन्न झालेले उपक्रम

26
Jun 25
श्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली या अंतर्गत जेष्ठ नागरिक तपासणी

प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी या ठिकाणी श्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली या अंतर्गत जेष्ठ नागरिक तपासणी करणेत आलेले आहे. यामध्ये सर्व नागरिकांची रक्त तपासणी,ब्लडप्रेशर, आरोग्य माहिती, डॉक्टर भूषण मस्के वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरी यांनी शिबिरात सविस्तर माहिती देण्यात आली.

अधिक माहिती...
26
Jun 25
जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी , रक्त तपासणी, बीपी तपासणी आरोग्य मार्गदर्शन प्रा आ केंद्र क.आरळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर डॉ अंकिता कानूगडे वैद्यकीय अधिकारी, श्री एल एम दुधवाडकर आरोग्य सहाय्यक, श्रीमती संध्या महाजन आरोग्य सहायिका , आरोग्य सेविका रेवती पोर्लेकर, आशा सेविका, व सर्व ग्रामस्थ,,

अधिक माहिती...
25
Jun 25
आरोग्य वरधिनी केंद्र शेळोली येथे जेष्ठ नागरिक तपसिनी करणेत आली

आरोग्य वरधिनी केंद्र शेळोली येथे जेष्ठ नागरिक तपसिनी करणेत आली

अधिक माहिती...
25
Jun 25
आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप

प्राथमिक आरोग्य केंद्र मडिलगे बु अंतर्गत मौजे कलनाकवाडी येथे आशा स्वयं सेविका मार्फत आयुषमान भारत गोल्डन कार्ड वाटप करणेत आले

अधिक माहिती...
25
Jun 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया शिबीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यकमांतर्गत ग्रामीण रुग्णालय हातकणंगले , येथे कार्यरत वैदयकिय पथकाकडून शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये Circumcision - 5 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी सर्जन डॉ. राजीव जाधव व भुलतज्ञ - डॉ . स्नेहल व्हटकर यांचे सहकार्य लाभले .

अधिक माहिती...
22
Jun 25
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत अतिक्रमण मुक्त शहरासाठी इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रयत्न

मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार उपायुक्त नंदू परळकर, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष सावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील रस्ते मोकळ्या जागा व पदपथा वरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे .या मोहिमेत शहरातील शहापूर रोड आर.टी.ओ. कार्यालय समोरील येथील फुटपाथवरील पत्र्याचे शेड, लक्ष्मी मार्केट येथील स्टॉलचे‌ अतिक्रमण हटविले तसेच नेहरूनगर झोपडपट्टी येथील रस्त्यावर विनापरवाना लावलेली कमान काढून जप्त करण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे , गणेश पुजारी , हिंदुराव जावळे , गणेश आवळे , आकाश बोरे , विकास लाखे , मारुती जावळे , रोहित कांबळे , विनोद गेजगे , दिलीप भोरे आदिंचा सहभाग होता.

अधिक माहिती...